बांबरवाडी (ता.शिराळा) येथे तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या पारायण सोहळ्याचे हे २५ वे वर्ष असल्याने रौप्य महोत्सवानिमित्ताने विविध धर्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळ व संध्याकाळ महाप्रसाद म्हणून दोन वेळ जेवणाची सोय केली होती.सर्व लोकं देवळात प्रसादासाठी एकत्रित येत असल्यामुळे सात दिवस वाडीत चूल बंद होती. त्यामुळे एक आठवडाभर वेगळया सामाजिक सलोख्याचे वातावरण तयार झाले होते.
हा पारायण सोहळा ९ ते १६ मार्च पर्यंत सुरु होता.यावेळी बाजीराव भाडुगळे(भाडुगळे),हनुमान बडे (देवाची आळंदी ),दादा महाराज मानेवाडी,विजय महाराज रामीष्ठ,बाबुराव महाराज मस्करवाडी,उत्तम पुजारी महादेववाडी,संतोष नलवडे काळगाव,जयवंत पाटील राधानगरी यांचे प्रवचन व कीर्तन झाले. गुढे, ढाणकेवाडी, बांबरवाडी, बेंद, भाडुगळेवाडी, मणदूर धनगरवाडा,करपेवाडी, तेटमेवाडी,निवी,मानेवाडी,पाचगणी,काळगाव धनगरावाडा, येसलेवाडी, गुंडगेवाडी, कोकणेवाडी, जळकेवाडी,आरळा, खोतवाडी,बेरडेवाडी,विठ्ठलवाडी येथील भजनी मंडळाने साथ दिली.
पहाटे चार ते पाच काकड आरती,आठ ते ११ वाचन,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,६ते ७प्रवचन,रात्री ९ ते ११ कीर्तन,साडे अकरा नंतर हरी जागर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.व्यासपीठ चालक म्हणून मोहन महाराज,गायनाचार्य जगन्नाथ महाराज,मृदूंगमणी दीपक महाराज आळंदी,हार्मोनियम वादक म्हणून भीमराव महाराज आरळा यांनी काम पाहिले.शनिवारी सकाळी अभिषेक करून सायंकाळी दीपोत्सव करण्यात आला.त्यानंतर चंद्रकांत बर्गे चिंचनेर (निंब) सातारा यांच्या भारूडाचा कार्यक्रम झाला.रविवारी सकाळी ८ ते १० गाथा प्रतिमा व दिंडी मिरवणूक काढण्यात आली. मोहन महाराज आळंदी यांचे काल्याचे कीर्तन झाले.दुपारी महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments